सूरत- कोरोनाविरुद्धच्या लढाईत, क्रिकेटर पठाण बंधू मैदानात उतरले आहेत. इरफान आणि युसूफ पठाण यांनी ४००० हून अधिक मास्क गरजूंना दान दिलं आहे.
इरफानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, मी आणि युसूफने मेहमूद खान पठाण चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने मास्क खरेदी केले आहेत. हे मास्क वडोदराच्या आरोग्य विभाग आणि गरजूंना वाटले जातील. दरम्यान, हा ट्रस्ट इरफानचे त्याचे वडील चालवतात.
कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी ही छोटीसी मदत आहे. ही सुरुवात असून आम्ही अशीच मदत करत राहू, असेही इरफानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच त्याने गर्दी न होऊ देता एकमेकांना मदत करा, असे आवाहन केलं आहे.