महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

IND vs NZ : IPS असीम अरुण यांनी गाजवला कानपूर कसोटी सामना - Kanpur Police Commissioner Asim Arun

भारत विरुध्द न्यूझीलंड (India v New Zealand) यांच्यात कानपूरच्या ) पहिला कसोटी सामना ( first cricket Test match) सुरू आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करीत 345 धावा केल्या. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने या लक्ष्याचा पाठलाग करताना 296 धावापर्यंत मजल मारली. परंतु खेळाव्यतिरिक्त पहिला आणि दुसरा दिवस गाजवणारे वेगळेच लोक चर्चेत राहिले. याबद्दलची रंजक गोष्ट जरुर वाचा...

IPS असीम अरुण
IPS असीम अरुण

By

Published : Nov 27, 2021, 4:58 PM IST

भारत विरुध्द न्यूझीलंड (India v New Zealand) यांच्यात सुरू असलेला पहिला कानपूर सामना मैदानातील खेळामुळे तर गाजतोयच, परंतु मैदानातील प्रेक्षकांच्यामुळेही चर्चेत आला आहे. कानपूरात खेळल्या जात असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी एका व्यक्तीचा गुटखा खात असल्याचा फोटो (Gutkha Man) व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर भरपूर मीम्सही पाहायला मिळाले.

गुटखावाल्यामुळे पहिला दिवस चर्चेत

ज्याचा हा फोटो व्हायरल झाला त्या व्यक्तीचे नाव शोभीत पांडे (Shobhit Pandye) असे आहे. या महाशयांवर जोरदार टीका सुरू आहे. त्याने आपण गुटखा खाल्ला नव्हता तर ती गोड सुपारी होती असे म्हटलंय. या सुपारीत तंबाखू नव्हता असे त्याने दावा केलाय. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही अनेक प्रेक्षकांनी हाता बॅनर आणि पोस्टर झळकवून निषेध व्यक्त केला होता.

दुसरा दिवस गाजवला पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी..

सामन्याच्या दुसऱ्या दिवशीची संध्याकाळी या विषयाला कलाटणी मिळाली. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात खेळल्या जात असलेल्या या मैदानात कसोटी सामना पाहण्यासाठी आलेले लोक आपापल्या सीटवर कचरा टाकून निघून गेले. त्यानंतर स्वच्छतेसाठी पुढे आले कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण (Asim Arun). त्यांनीच स्टेडियममधील कचरा उचलण्यास सुरुवात केली. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अरुण यांनी घेतलेल्या या पुढाकारचे सोशल मीडियावर त्यांचे भरभरून कौतुक होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी खूप कौतुकास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अरुण यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे."बर्‍याच काळानंतर उद्या ग्रीन पार्क पुन्हा चमकेल. काही देशांचे लोक स्टेडियम स्वच्छ ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात हे ऐकले आणि वाचले, आपणही असे काही करू शकतो का?", असा प्रश्न अरुण यांनी उपस्थित केला.

कोण आहेत पोलीस आयुक्त असीम अरुण?

पोलीस आयुक्त असीम अरुण हे १९९४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांचा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा दलातही समावेश करण्यात आला होता. देशातील पहिली SWAT टीम असीम अरुण यांनी तयार केली होती. याबरोबरच एसपीजी, एनएसजी आणि सीबीआइमध्येही त्यांनी आपली सेवा दिली आहे.

हेही वाचा - Ind Vs Nz 1st Test : न्यूझीलंडच्या सलामीवीरांची नाबाद अर्धशतके, भारताला चोख प्रत्युत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details