नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 31 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. गेल्यावेळेप्रमाणेच या वेळीही १० संघ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. या कालावधीत एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएलच्या 16व्या हंगामात गुजरात टायटन्ससमोर आपले विजेतेपद राखण्याचे आव्हान असेल, तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा आपला जुना पराक्रम दाखवण्याचा प्रयत्न करतील.
संघाने सर्वाधिक सामने खेळले :पण तुम्हाला माहिती आहे का की, आयपीएलच्या आतापर्यंत खेळलेल्या १५ आवृत्त्यांमध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक सामने खेळले आहेत आणि कोणत्या संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. चला तर मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे आणि इतर संघांची स्थिती काय आहे.
मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर सर्वाधिक सामने :सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाच्या नावावर सर्वाधिक सामने खेळण्याचा तसेच सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आहे. मुंबई इंडियन्ससाठी मागचा मोसम चांगला नव्हता. मात्र, यावेळी जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल.
आयपीएलमध्ये एकूण 231 सामने खेळले :मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये एकूण 231 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी 129 सामने जिंकले आहेत, तर 98 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. दुसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आहे. त्याने खेळल्या 227 मॅचमध्ये त्याला विजयापेक्षा जास्त पराभव पत्करावा लागला आहे. बंगळुरू संघाने केवळ 107 सामने जिंकले आहेत, तर 113 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.