बंगळुरु-आयपीएल लिलाव सुरु असताना लिलाव करणारे ह्यूग एडमीड्स अचानक ( Hugh Edmeades Collapsed During Auction ) पडले. त्यामुळे काही काळ लिलाव बंद करण्यात आला होता. लाईव्ह प्रक्षेपण सुरु असताना लिलाव करणारा पडला असल्याचे ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. दरम्यान, त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.
IPL Auction 2022 : आयपीएल लिलाव सुरु असताना ऑक्शनर पडले - Hugh Edmeades Collapsed latest news
आयपीएल लिलाव सुरु असताना लिलाव करणारे ह्यूग एडमीड्स अचानक पडले. त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती देण्यात आली ( Hugh Edmeades Collapsed During Auction ) आहे.
2019 साली ह्यूग एडमीड्स आयपीएल लिलावासाठी आले होते. मागील चार वर्षापासून ते लिलाव पुकारत आहेत. वेल्सच्या रिचर्ड मॅडली यांची जागा एडमीड्स यांनी घेतली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सांगितले होते की, एडमीड्स पुन्हा एकदा लिलावकर्ता म्हणून परत येत आहे.
यापुर्वीसुद्धा एडमीड्स यांनी लिलावकर्ता म्हणून उत्तम कार्य केले आहे. ते पहिल्यांदाच महालिलावात बोली लावण्यालाठी आले आहे. त्यांच्या आधी रिचर्ड मॅडली लिलाव सांभाळत असे. एडमीड्स यांनी जगभरात 2700 पेक्षा लिलावाची जबाबदारी संभाळली आहे. 1984 साली एडमीड्स यांनी पहिल्यांदा लिलावाची बोली लावण्यास सुरुवात केली होती.