नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलच्या तयारीसाठी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले आहे. नेटवर माहीने प्रचंड मेहनत घेत गोलंदाजांना जेरीस आणले आहे. प्रॅक्टीसमध्ये गोलंदाजांना उत्तुंग षटकार ठोकत त्याने त्यांचा घाम काढला आहे. यावेळी धोनी चेन्नईला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. चेन्नई सुपर किंग्सने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी मैदानावर कसा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धोनी आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुकता आहे.
CSK चा व्हिडिओ चांगलाच झाला व्हायरल : CSK चा हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा 34 सेकंदाचा व्हिडिओ चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमचा आहे. यामध्ये धोनी नेटवर सराव करताना दिसत आहे. धोनी मैदानावर कशी आक्रमक फलंदाजी करतो हे स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी CSK आयपीएल 2023 चे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर धोनीनेही आयपीएलसाठी स्वत:ची पूर्ण तयारी सुरू केली आहे.
धोनीच्या व्हिडीओला चाहत्यांचे लाईक्स :या व्हिडिओमध्ये धोनी सीएसकेचा हाफ टी-शर्ट आणि हाफ पेंटमध्ये दिसत आहे. यासोबतच त्याने हेल्मेट, पॅड आणि थाई पॅड घातले आहेत. धोनी सरावासाठी मैदानात जाताच संपूर्ण स्टेडियममध्ये बसलेले त्याचे चाहते धोनी... थाला... थाला म्हणत घोषणाबाजी करू लागतात. अशा प्रकारे चाहते धोनीला प्रोत्साहन देतात. सोशल मीडियावरही त्याच्या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत असल्याचे दिसते.