नवी दिल्ली : आयपीएलच्या साखळी टप्प्यात एकूण 70 सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या मोसमात कर्णधार असलेले अनेक खेळाडू यावेळीही कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहेत. सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला एमएस धोनी या मोसमात पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) नेतृत्व करणार आहे. सीएसकेला चार वेळा विजेतेपद मिळवून देणारा धोनी आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. CSK ने 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून शेवटच्या वेळी विजेतेपद पटकावले होते.
रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार :मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन बनवणारा रोहित शर्मा हा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. यावेळीही तो खेळाडूंचे नेतृत्व करणार आहे. आणि हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा गुजरात टायटन्सचे नेतृत्व करेल. पंड्याचा संघ गुजरात टायटन्सने आयपीएल 15 मध्ये पदार्पण केले. पहिल्याच सत्रात संघ चॅम्पियन ठरला. डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असेल. यावेळी पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन असेल. सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व ईडन मार्कराम करणार आहे.