नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांना सिओल शांती पुरस्कार देण्यात येणार आहे. २०१८च्या पेयोंगचांग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी बाख यांना हा पुरस्कार मिळणार आहे. ''बाख यांनी ऑलिम्पिकच्या लोकप्रियतेत वाढ करण्याचे कार्य केले. त्यांनी खेळाच्या माध्यमातून शांती प्रस्थापित करण्यासाठी समर्पितपणे कार्य केले आहे'', असे सिओल शांती पुरस्कार फाउंडेशनने सांगितले.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांचा होणार गौरव - थॉमस बाख गौरव
२०१८च्या पेयोंगचांग हिवाळी स्पर्धेत उत्तर कोरियाच्या सहभागासाठी बाख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दक्षिण कोरियामध्ये या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. या कामगिरीसाठी आयओसी अध्यक्ष थॉमस बाख यांना सिओल शांती पुरस्कार देण्यात येणार आहे.
पेयोंगचांग हिवाळी स्पर्धेत उत्तर कोरियाच्या सहभागासाठी बाख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दक्षिण कोरियामध्ये या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. फाऊंडेशनने म्हटले आहे की, आयओसी अध्यक्ष बाख यांनी शरणार्थी ऑलिम्पिक टीम आणि शरणार्थी ऑलिम्पिक फाऊंडेशन तयार करण्यासाठी कठोर परिश्रम केले. त्यांनी निर्वासितांच्या प्रश्नांवर जागतिक जागरूकता पसरविण्यासाठी मानवी हक्कांचे समर्थन केले.
१५व्या सिओल शांती पुरस्कार सोहळ्यात बाख यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. हा सोहळा एका वर्षाच्या आत घेण्यात येईल. बाख म्हणाले, "हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार आयओसी आणि ऑलिम्पिक चळवळीला समर्पित आहे, कारण, इतक्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य झाले नसते. हा पुरस्कार ऑलिम्पिक चळवळीसाठी प्रेरणा असून यामुळे आमचे प्रयत्न आणखी बळकट होतील."