महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

थॉमस बाख यांना सियोल शांती पुरस्कार - seoul peace prize 2020

दोन लाख डॉलर्स अशी या शांती पुरस्काराची रक्कम आहे. ही रक्कम बाख ऑलिम्पिक शरणार्थी फाउंडेशनला देणार आहेत. बाख म्हणाले, "हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार आयओसी आणि ऑलिम्पिक चळवळीला समर्पित आहे.''

ioc president thomas bach received seoul peace prize
थॉमस बाख यांना सियोल शांती पुरस्कार

By

Published : Oct 27, 2020, 3:53 PM IST

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांना सोमवारी प्रतिष्ठित सियोल शांती पुरस्कार मिळाला. आयओसीने यासंदर्भात माहिती देणारे निवेदन जारी केले. बाख यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात भाग घेतला. बाख यांच्यातर्फे हा पुरस्कार संयुक्त राष्ट्र संघाचे माजी सरचिटणीस बान की मून यांनी स्वीकारला.

दोन लाख डॉलर्स अशी या शांती पुरस्काराची रक्कम आहे. ही रक्कम बाख ऑलिम्पिक शरणार्थी फाउंडेशनला देणार आहेत. बाख म्हणाले, "हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा पुरस्कार आयओसी आणि ऑलिम्पिक चळवळीला समर्पित आहे, कारण, इतक्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय ते शक्य झाले नसते. हा पुरस्कार ऑलिम्पिक चळवळीसाठी प्रेरणा असून यामुळे आमचे प्रयत्न आणखी बळकट होतील."

पेयोंगचांग हिवाळी स्पर्धेत उत्तर कोरियाच्या सहभागासाठी बाख यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दक्षिण कोरियामध्ये या स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. फाऊंडेशनने म्हटले आहे की, आयओसी अध्यक्ष बाख यांनी शरणार्थी ऑलिम्पिक टीम आणि शरणार्थी ऑलिम्पिक फाऊंडेशन तयार करण्यासाठी कठोर परिश्रम केले. त्यांनी निर्वासितांच्या प्रश्नांवर जागतिक जागरूकता पसरविण्यासाठी मानवी हक्कांचे समर्थन केले.

ऑलिम्पिक स्पर्धा -

यावर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली गेली होती, परंतु कोरोनाव्हायरसमुळे ती एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा तहकूब करण्याची घोषणा होईपर्यंत एकूण ५७ टक्के पात्रता पूर्ण झाली होती. पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details