महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह - ioa vp corona news

मित्तल म्हणाले, की त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत आणि ते बरे आहे. मित्तल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वारंटाइन आहेत आणि उपचार घेत आहेत.

ioa vice president sudhanshu mittal tests corona positive
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Nov 3, 2020, 3:25 PM IST

नवी दिल्ली -भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) उपाध्यक्ष सुधांशू मित्तल यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते मित्तल यांनी मंगळवारी ट्विट करून याची पुष्टी केली. "मित्रांनो, मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो", असे मित्तल ट्विटमध्ये म्हणाले.

मित्तल म्हणाले, की त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत आणि ते बरे आहे. मित्तल डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वारंटाइन आहेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत.

भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष असलेले मित्तल सोमवारी दिल्ली स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशनच्या (डीएसजेए) क्रीडा पत्रकारांना भेटणार होते. पण त्यांची तब्येत खराब असल्याचे ही बैठक स्थगित करण्यात आली. त्यानंतर मित्तल कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

ABOUT THE AUTHOR

...view details