महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या वडिलांना कोरोना - ioa president latest news

"माझ्या वडिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही त्यांना 25 मे रोजी रुग्णालयात दाखल केले", असे बत्रा यांनी सांगितले.

ioa president narinder batra's father tests positive for covid 19
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या वडिलांना कोरोना

By

Published : May 29, 2020, 7:39 AM IST

नवी दिल्ली - भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासोबत घरात काम करणारे चार कर्मचारीही संसर्गित झाल्याचे बत्रा यांनी सांगितले. या व्यतिरिक्त, नवी दिल्ली आणि फरीदाबाद येथील त्यांच्या कार्यालयात प्रत्येकी एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. नरिंदर बत्रा यांची चाचणी मात्र नेगेटिव्ह आली आहे.

"माझ्या वडिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही त्यांना 25 मे रोजी रुग्णालयात दाखल केले", असे बत्रा यांनी सांगितले.

बत्रा पुढे म्हणाले, "आमच्या कुटुंबातील पाच सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. आमच्या घरात प्रत्येकाची चाचणी करण्यात आली आहे. आम्ही 3 ते 4 जून या कालावधीत पुन्हा एकदा चाचणी घेऊ. तोपर्यंत आम्ही आजपासून 17 दिवस स्वत: ला क्वारंटाईन करत आहोत. दोन्ही कार्यालये बंद करण्यात आली आहेत. "

ABOUT THE AUTHOR

...view details