महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षांनी सहकुटुंब घेतली कोरोनाची लस - आयओए नरिंदर बत्रा कोरोना न्यूज

बत्रा म्हणाले, "माझे कुटुंब (माझी पत्नी चेतना, माझा भाऊ हेमंत आणि त्यांची पत्नी राधिका आणि माझा भाऊ जयंत नंदा) आणि मी २८ जानेवारी २०२१ रोजी कोरोनाची चाचणी केली. आम्ही सर्वांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडिश फार्म फर्म अ‍ॅस्ट्राएनिका यांच्या भागीदारीत एसआयआयने विकसित केलेली कोविशिल्ड लस घेतली.''

IOA President Narinder Batra gets first dose of COVID-19 vaccine
भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षांनी सहकुटुंब घेतली कोरोनाची लस

By

Published : Jan 30, 2021, 3:56 PM IST

नवी दिल्ली -भारतीय ऑलिम्पिक समितीचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा आणि त्याच्या कुटुंबीयांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) विकसित केलेली कोविशिल्ड लस घेतली आहे. चार आठवड्यांनंतर लसचा दुसरा डोस घेणार असल्याची माहिती बत्रा यांनी दिली.

हेही वाचा - भारत वि. इंग्लंड : तिसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडच्या संघात येणार स्फोटक फलंदाज

बत्रा म्हणाले, "माझे कुटुंब (माझी पत्नी चेतना, माझा भाऊ हेमंत आणि त्यांची पत्नी राधिका आणि माझा भाऊ जयंत नंदा) आणि मी २८ जानेवारी २०२१ रोजी कोरोनाची चाचणी केली. आम्ही सर्वांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि ब्रिटीश-स्वीडिश फार्म फर्म अ‍ॅस्ट्राएनिका यांच्या भागीदारीत एसआयआयने विकसित केलेली कोविशिल्ड लस घेतली. आम्ही आता ठीक आहोत आणि आता आम्ही चार आठवड्यांनंतर दुसरा डोस घेणार आहोत. आम्हाला सांगण्यात आले आहे की, २८ जानेवारीपासून ६ आठवड्यांत शरीरात अँन्टीबॉडीज विकसित होतील.''

गेल्या आठवड्यात बत्रा म्हणाले होते की, ऑलिम्पिक-खेळाडूंचे लसीकरण होणे हे महासंघाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लवकरच एक योग्य योजना तयार केली जाईल. आम्ही आरोग्य मंत्रालय, क्रीडा मंत्रालय आणि नाडा यासह सर्व संबंधित विभागांशी चर्चा करीत आहोत.

ABOUT THE AUTHOR

...view details