महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Asian Games Tennis : मराठमोळ्या ऋतुजा भोसलेनं रोहन बोपण्णासोबत टेनिसच्या मिश्र दुहेरीत जिंकलं सुवर्णपदक... - रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले सुवर्णपदक जिंकले

Rohan bopanna And Rutuja bhosale : रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी आशियाई क्रीडा 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. रोहन आणि ऋतुजानं अंतिम फेरीची सुरुवात खूप जबरदस्त केली होती. या जोडीनं टेनिसच्या मिश्र दुहेरी सामन्यात शेवटचा सेट 10-4 असा शानदार खेळून सामना जिंकला.

Rohan bopanna And Rutuja bhosale
रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 5:36 PM IST

Updated : Sep 30, 2023, 6:29 PM IST

मुंबई - Rohan bopanna And Rutuja bhosale : रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी शनिवारी आशियाई क्रीडा 2023 मध्ये जबरदस्त कामगिरी केली. रोहन आणि ऋतुजानं टेनिसमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं आहे. या भारतीय जोडीनं टेनिस मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत तैपेईच्या त्सुंग-हाओ हुआंग आणि लियांग एन शुओ यांचा पराभव करून सुवर्णपदक पटकवलं आहे. रोहन आणि ऋतुजा यांनी अंतिम सामना हा 2-6, 6-3 ,10-4 ने जिंकला आहे. हा सामना एक तास 14 मिनिटे चालला. रोहननं अंतिम फेरीत सुरुवात खूप जबरदस्त केली. रोहन आणि ऋतुजानं टेनिसच्या मिश्र दुहेरी सामन्यात शेवटच्या सेटमध्ये 10-4 असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आहे.

टेनिसच्या मिश्र दुहेरी सामान्यात रोहन आणि ऋतुजाची बाजी : रोहन आणि ऋतुजा यांनी दुसऱ्या सेटमध्ये चांगली लढत दिली. पहिल्या सात गेममध्ये दोन्ही संघांमध्ये कोणताही फरक नव्हता. या भारतीय जोडीनं आठव्या गेममध्ये निर्णायक ब्रेकसह बरोबरी साधली आणि सेट 6-3 असा टायब्रेक जिंकला. त्यानंतर गेममध्ये रोहन आणि ऋतुजानं आघाडी घेत काही वेळातच 6-1 बढत घेतली. हुआंग आणि लिआंग क्यूईनं प्रयत्न केला पण त्याचा त्यांना काही उपयोग झाला नाही. भारतीय टेनिसपटूंनी आपल्या गेमचा वेग कायम राखला आणि टायब्रेकरमध्ये शेवटी 10-4 असा विजय मिळवत पदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील ऋतुजाचं हे पहिलंच पदक आहे. त्याचबरोबर रोहननं आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं आहे. यापूर्वी त्यानं जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं.

रोहन आणि ऋतुजाने रचला इतिहास :रोहन आणि रुतुजा यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तानच्या झिबेक कुलुम्बेवा आणि ग्रिगोरी लोमाकिन यांचा 7-5, 6-3ने पराभव केला आहे. या जोडीनं उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या हाओ-चिंग चॅन आणि यू-स्यू हसू यांचा 6-1, 3-6, 10-4 ने पराभव केला. भारतानं टेनिस मिश्र दुहेरी आशियायी सामन्यांमध्ये तीन सुवर्णांसह सात पदके जिंकली आहेत. दोहा 2006 येथे लिएंडर पेस-सानिया मिर्झा आणि इंचॉन 2014 येथे साकेथ मायनेनी-सानिया मिर्झा टेनिस मिश्र दुहेरी सामन्यात विजयी ठरले होते. भारतानं 2002 मध्ये बुसान येथे टेनिसमध्ये चार, 2006 मध्ये दोहा येथे चार, 2010 मध्ये ग्वांगझू येथे पाच, 2014 मध्ये इंचॉन येथे पाच आणि 2018 मध्ये जकार्ता येथे तीन पदके जिंकली होती.

Last Updated : Sep 30, 2023, 6:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details