मस्कत -भारतीय टेबल टेनिसपटू मुदित दानीने २०२० आयटीटीएफ चॅलेन्जर प्लस ओमान ओपनमध्ये चांगली सुरूवात केली आहे. मुदितने आपला पहिल सामना ४-० ने जिंकला. त्याने पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात ओमानच्या असद अलारियासीचा ११-६, ११-२, ११-५, ११-४ असा पराभव केला.
हेही वाचा -ISL FINAL : एटीके एफसी आणि चेन्नई एफसी यांच्यात रंगणार द्वंद्व
मुदितचा पुढील सामना पोर्तुगालच्या मार्कोस फ्रीटासशी होईल. दुसरीकडे भारतीय खेळाडू मानुष शाहने ४-१ ने विजय मिळवत 'राउंड-ऑफ-३२' मध्ये स्थान पक्के केले आहे. मानुषने ओमानच्या मुहम्मद अल बालुशीला १२-१०, ११-१, ११-५, ११-४, ११-५ असे हरवले. मानुषचा पुढील सामना भारताच्या अचंता शरथ कमलशी होईल.
पहिल्या फेरीत अचंताशिवाय मानव ठक्कर आणि हरमीत देसाई यांना बाय मिळाला आहे.