महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कुस्तीपटू बजरंग म्हणतो, 'काश्मीरमध्ये सासर नको आणि घरही नको'

कलम ३७० रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाने एक ट्विट केले आहे.

कुस्तीपटू  बजरंग म्हणतो, 'काश्मीरमध्ये सासर नको आणि घरही नको'

By

Published : Aug 11, 2019, 4:57 PM IST

Updated : Aug 11, 2019, 5:09 PM IST

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्यांचा दर्जा देणारे कलम ३७० हटवले गेले. या प्रकरणावर अनेक दिग्गज व्यक्तींनी आपले विचार मांडले. यादरम्यान, भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियानेही आपले मत सर्वांसमोर ठेवले आहे.

कलम ३७० रद्द केल्यानंतर बजरंग पुनियाने एक ट्विट केले आहे. या ट्विटद्वारे त्याने एक शांतीचा संदेश दिला आहे. 'काश्मीरमध्ये सासर नको आणि घरही नको. शिवाय, कोणत्याही सैनिकाचे शरीर तिरंग्यामध्ये गुंडाळून घरी नाही आले पाहिजे, असा भारत देश आम्हाला हवा आहे.' असे बजरंगने त्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटच्या अगोदर, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कलम ३७० रद्द केल्यानंतर तिथल्या महिलांशी आता लग्न करता येऊ शकते असे म्हटले होते. त्याअगोदर, उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते विक्रम सैनी यांनी 'आता काश्मीरच्या महिलांशी लग्न करण्याचा हक्क बजावावा' असे आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हटले होते.

Last Updated : Aug 11, 2019, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details