हैदराबाद -८१ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टेबल टेनिसपटू हरमीत देसाईने जेतेपद पटकावले. त्याने चौथ्या मानांकित मानव ठक्करला ४-३ अशी मात दिली. हरमीतचे हे पहिले राष्ट्रीय जेतेपद आहे.
हेही वाचा -टी-२० क्रिकेटमध्ये हिटमॅनचा कोहलीला धोबीपछाड
तर, दुसरीकडे हरयाणाच्या सुतिर्था मुखर्जीने एकतर्फी सामन्यात कृत्विका सिंहा रायचा ४-० असा पराभव केला. सुतिर्थानेही सांघिक आणि महिला दुहेरीत सुवर्ण आणि मिश्र स्पर्धांमध्ये रौप्यपदक जिंकले. पाचव्या मानांकित हरमीतने २०१३ नंतर प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. हरमीतला २.५ लाख तर, सुतिर्थाला १.६५ लाखाचे पारितोषिक देण्यात आले.
पुरुष दुहेरीत झुबिन कुमार आणि सौम्यजित घोष यांच्या जोडीने मानुष शहा आणि ईशान हिंगोरानीचा ३-१ ने पराभव केला. महिला दुहेरीत सुतीर्थ आणि रीती शंकरने सुरभी पटवारी व पोयमंती बैश्य यांना ३-१ने पराभूत केले.