नवी दिल्ली - स्पेनमध्ये बोक्सम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा १४ सदस्यीय बॉक्सिंगपटूंचा संघ आज स्पेनकडे रवाना झाला आहे. एक मार्च ते सात मार्च या दरम्यान, ही स्पर्धा रंगणार आहे.
सहा वेळची जगज्जेती महिला बॉक्सर एमसी मेरी कोम देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. ती ५१ किलो गटातून रिंगमध्ये उतणार आहे. तर राष्ट्रकुलमध्ये रौप्य पदक जिंकणारा मनीष कौशिक ६३ किलो वजनी गटात प्रतिस्पर्धींशी दोन हात करणार आहे. हे दोन्ही बॉक्सर मार्च २०१९ मध्ये जॉर्डनमध्ये झालेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेनंतर प्रथमच रिंगमध्ये उतरणार आहेत.