महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्क्वॉश : पिट्सबर्ग ओपनच्या अंतिम सामन्यात सौरव घोषाल पराभूत - सौरभ घोषाल लेटेस्ट न्यूज

डेसाउकीने रविवारी रंगलेल्या या अंतिम सामन्यात घोषालचा ७-११, ४-११, ९-११ ने पराभव केला. घोषालने इजिप्तच्या ओमर मोसादला हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

indian Squash player saurav Ghoshal loses in Pittsburgh Open final
स्क्वॉश : सौरव घोषाल पिट्सबर्ग ओपनच्या अंतिम सामन्यात पराभूत

By

Published : Jan 28, 2020, 8:02 AM IST

पिट्सबर्ग -भारताचा स्टार स्क्वॉशपटू सौरव घोषालला पिट्सबर्ग ओपनच्या अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले. इजिप्तच्या फारेस डेसाउकीने घोषालला सरळ सेटमध्ये मात दिली.

हेही वाचा -IPL २०२० : ठरलं तर.. फायनलचा थरार रंगणार मुंबईत.. ही आहे तारीख

डेसाउकीने रविवारी रंगलेल्या या अंतिम सामन्यात घोषालचा ७-११, ४-११, ९-११ ने पराभव केला. या सामन्यात सौरवला विजय मिळवता आला असता तर, त्याला व्यावसायिक स्क्वॉश असोसिएशनच्या (पीएसए) वर्ल्ड टूर टूर्नामेंटचे तिकीट मिळू शकले असते. घोषालने इजिप्तच्या ओमर मोसादला ११६, १६-१८, ११-७, १२-१० असे हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details