महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'हौसले जिंदा है', 'चांद्रयान - २' च्या मोहिमेवर खेळाडूंनी दिल्या प्रतिक्रिया... - sportsperson reaction on chandrayan 2

शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, योगेश्वर दत्त, आकाश चोप्रा, हरभजन सिंग या सर्वांनी ट्विटरवरुन शास्त्रज्ञांना बळ दिलं आहे.

'हौसले जिंदा है', 'चांद्रयान - २' च्या मोहिमेवर खेळाडूंनी दिल्या प्रतिक्रिया...

By

Published : Sep 7, 2019, 2:21 PM IST

बंगळुरु -संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या 'चांद्रयान २ मोहिमेच्या अंतिम टप्प्यात चंद्राच्या २.१ किलोमीटर जवळ गेल्यानंतर विक्रम लँडरचा संपर्क तुटला. त्यामुळे शास्त्रज्ञांसह देशभरातील सर्वांचाच हिरमोड झाला. मात्र, यामुळे निराश न होता पुन्हा नवी भरारी घेण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवण्यासाठी कलाविश्वासोबतच क्रिकेटपटूदेखील समोर आले आहेत.

शिखर धवन, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, योगेश्वर दत्त, आकाश चोप्रा, हरभजन सिंग या सर्वांनी ट्विटरवरुन शास्त्रज्ञांना बळ दिलं आहे.

हेही वाचा -Chandrayaan 2: इस्रोचे प्रमुख सिवन यांना अश्रू अनावर, पंतप्रधानांनी केले सांत्वन

'ख्वाब अधुरा राहा पर हौसले जिंदा है', अशा आशंयाचं ट्विट करत वीरेंद्र सेहवाग याने 'इस्रो'चं मनोधैर्य वाढवले आहे.

'जर आपण आपल्या चुकांमधुन शिकलो नाही, तर ते अपयश असेल. मात्र, आपण पुन्हा नवी भरारी घेऊ. इस्रोच्या संपूर्ण टीमला अभिवादन', असं गौतम गंभीर यानं म्हटलं आहे.

याशिवाय, शिखर धवन, योगेश्वर दत्त, आकाश चोप्रा, हरभजन यांनीही 'चांद्रयान - २' च्या मोहिमेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details