टोकियो - रियो ऑलिम्पिकमधील निराशजनक कामगिरीनंतर आपल्या कामगिरीत दिवसागणिक सुधारणा करत असलेले भारतीय नेमबाज टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धाराने उतरतील. यंदा भारतीय नेमबाज संघातील खेळाडूंकडून एक-दोन नव्हे तर चार पदकाची आशा व्यक्त केली जात आहे.
भारताचे 15 नेमबाज टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहे. सर्वच्या सर्व नेमबाज पदक जिंकण्यात सक्षम आहेत. काही जणांना तर पदकाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. यातील सौरभ चौधरीचा सामना ऑलिम्पिक आणि विश्वविजेत्या खेळाडूंशी होणार आहे. पुरूष 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा भारताचे प्रतिनिधित्व करतील.
महिला नेमबाजांमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये अपूर्वी चंदेला आणि इलावेनिल वालारिवन यांच्यावर भारताच्या आशा आहेत.
आयएसएसएफ विश्व कपमध्ये तीन सुवर्णपदक जिंकलेली अपूर्वी चंदेला हिला टोकियो ऑलिम्पिकआधी कोरोनाची लागण झाली होती. तिचे हे दुसरे ऑलिम्पिक असून याआधी ती रियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरून देखील पायाला दुखापत झाल्याने खेळू शकली नव्हती.
जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली इलावेनिल देशाची सर्वश्रेष्ठ रायफल नेमबाज आहे. तिला ऑलिम्पिक पदक विजेता गगन नारंग मागील सात वर्षांपासून मार्गदर्शन करत आहे.