नवी दिल्ली -सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. यामधील काही व्हिडिओ हे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. असाच एक शाळकरी मुलांचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाळकरी मुलांचा अनोखा स्टंट पाहायला मिळत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ऑलिम्पिक विजेती नाडिया कोमेन्सीनेही या मुलांचे कौतुक केले आहे. तिनेदेखील हा व्हिडिओ शेअर करताना 'हे खूप मस्त आहे' असे म्हटले आहे. नाडिया ही पाच वेळा ऑलम्पिक विजेती ठरली आहे.