नवी दिल्ली -कोरोनानंतर प्रशिक्षण सुरू केल्यावर जुनी लय आणि वेग परत मिळवण्यास थो़डा वेळ लागेल, असे भारताची महिला धावपटू हिमा दासने म्हटले आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एसएआय) काही खेळातील खेळाडूंना प्रशिक्षण सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
जुनी लय आणि वेग परत मिळवण्यास थोडा वेळ लागेल - हिमा - hima das old rythm news
हिमाने मंगळवारी ट्विटरवर तिच्या चाहत्यांसमवेत प्रश्न-उत्तर सत्रात भाग घेतला. हिमा म्हणाली, ''आम्ही दोन महिन्यांपासून प्रशिक्षण घेत नसल्यामुळे मला नक्कीच वेळ लागेल याची खात्री आहे. आमचे प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम कसा करतात यावरदेखील हे अवलंबून आहे."

हिमा या लॉकडाऊन दरम्यान शांत आणि सकारात्मक राहण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. ‘ढिंग एक्स्प्रेस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमा दासने कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला होता. हिमा तिचा पगार आसाम सरकारच्या कोरोना मदत निधीमध्ये दिला.