महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारताच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम - विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप

अविनाशला अंतिम फेरीत जाता आले नसले तरी, त्याने हीट-३ मध्ये आठ मिनिटे आणि २५.२३ सेकंदाची वेळ नोंदवत विक्रम केला. प्रत्येक हीटच्या आघाडीच्या तीन खेळाडूला अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. केनियाच्या कोनसेसुल्स किपरुटोने पहिले तर, बेंजामिन किजेनने दुसरे स्थान मिळवले आहे.

विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारताच्या अविनाश साबळेचा राष्ट्रीय विक्रम

By

Published : Oct 2, 2019, 8:09 AM IST

दोहा -सध्या सुरु असलेल्या विश्व अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळेने सातवे स्थान राखले. या स्थानासोबतच त्याने ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

हेही वाचा -महिला टी-२० : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर ५१ धावांनी विजय, मालिकेत २-० ने विजयी आघाडी

अविनाशला अंतिम फेरीत जाता आले नसले तरी, त्याने हीट-३ मध्ये आठ मिनिटे आणि २५.२३ सेकंदाची वेळ नोंदवत विक्रम केला. प्रत्येक हीटच्या आघाडीच्या तीन खेळाडूला अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. केनियाच्या कोनसेसुल्स किपरुटोने पहिले तर, बेंजामिन किजेनने दुसरे स्थान मिळवले आहे.

किपरुटोने या स्पर्धेत आठ मिनिटे आणि १९.२० सेकंदाची वेळ नोंदवली. तर, बेंजामिनने आठ मिनिटे आणि १९.४४ सेकंदामध्ये हे अंतर पार केले. अमेरिकेचा हिलेरी बोर आठ मिनिटे आणि २०.६७ सेकंदासह तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे.

या स्पर्धेत भारताच्या मिश्र रिले संघाने सातवे स्थान राखले आहे. ४X४०० मीटर रिले स्पर्धेत भारताच्या मोहम्मद अनास, वेलुवा कारथ विस्मया, जिसना मॅथ्यू आणि नोग निर्मल टॉम या चार खेळाडूंच्या संघाने अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details