बहरीन -भारताचा रेसर जेहान दारूवालाने आपल्या कारकिर्दीची पहिली एफ-२ शर्यत जिंकली आहे. जेहानने साखिर ग्रँड प्रिक्समध्ये हा विजय नोंदवला. दिग्गज रेसर मायकेल शुमाकरचा मुलगा मिक शुमाकर या शर्यतीत १८व्या क्रमांकावर राहिला. तरीही, त्याने २०२० चॅम्पियनशिप आपल्या नावावर केली.
जेहान दारूवालाने जिंकली पहिली एफ-२ शर्यत हेही वाचा -सामन्यात अपयशी ठरलेल्या चहलने नोंदवला 'खास' विक्रम
मिक शुमाकरने २१५ गुणांसह हा किताब पटकावला. २२ वर्षीय जेहानने दुसर्या ग्रिडपासून शर्यत सुरू केली. त्याच्यासमवेत डॅनियल टिक्टुम होता. टिक्टुमने जेहानला बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा घेत शुमाकर पुढे गेला. मात्र, काही कालालधीनंतर जेहानने या दोघांना मागे टाकत आपली पहिली एफ-२ शर्यत जिंकली.
जेहानचा साथीदार आणि रेड बुल ज्युनियर संघाच्या युकी शुनोदाने दुसरा क्रमांक पटकावला. तो जेहानच्या ३.५ सेकंद मागे राहिला. टिक्टुमला तिसरे स्थान मिळाले.