नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे चाहते अनेकदा विराट कोहलीच्या चांगुलपणाबद्दल बोलतात आणि असे बरेच लोक आहेत, ज्यांना त्याच्या खेळातून प्रेरणा घेऊन विराट कोहलीसारखे बनायचे आहे. विराट कोहलीच्या या खास वैशिष्ट्यामुळे केवळ क्रीडा चाहतेच नाही, तर काही क्रिकेटपटूही आहेत ज्यांना क्रिकेटचा उगवता स्टार म्हणून टीम इंडियामध्ये स्थान निर्माण करायचे आहे. टीम इंडियामध्ये खेळून कोहलीसारखे नाव कमवायचे आहे.
भारताच्या वेगवान गोलंदाजाचे स्वप्न :भारतीय क्रिकेट संघाच्या एका वेगवान गोलंदाजाने असेच स्वप्न पाहिले आहे आणि विराट कोहलीने दिलेले असेच योगदान त्याला भारतीय क्रिकेटमध्ये द्यायचे आहे. हा स्टार गोलंदाज दुसरा-तिसरा कोणी नसून भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आहे. एका क्रिकेट वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत, भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी खुलासा केला आहे की, मोहम्मद सिराज विराट कोहलीच्या टॅलेंटने प्रभावित झाला होता आणि त्याला विराटसारखे बनण्यास साहाय्य करण्यास सांगितले होते. तसेच, त्याने याबाबतीत मदत करण्याची विशेष विनंती केली होती. विराट कोहलीची क्रिकेटमधील विशेष प्रतिभेने तो भारावून गेला होता, त्यामुळे त्याला विराट कोहलीसारखे बनायचे आहे.
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणाले :टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक असलेले अरुण म्हणाले की, मोहम्मद सिराज विराट कोहलीचा मोठा चाहता होता आणि आरसीबीकडून खेळताना त्याने मला सांगितले होते की त्याला विराट कोहलीसारखे व्हायचे आहे. खेळाडूच्या आतील एवढी उत्सुकता पाहून त्यालाही खूप काही शिकवण्याचा मी विचार केला. त्यानुसार त्याचा सरावदेखील मी करून घेतला.