महाराष्ट्र

maharashtra

भारताचा आंतरराष्ट्रीय सायकलपटू ते अपार्टमेंटचा सुरक्षारक्षक!

By

Published : Jun 5, 2020, 4:33 PM IST

70 वर्षीय स्वर्ण सिंग यांनी 1970मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पण आता ते बिकट परिस्थितीत असून जमशेदपूरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. स्वर्ण सिंग यांच्या दयनीय अवस्थेबद्दल कळताच एका अज्ञात व्यक्तीने बत्रा यांना पत्र लिहिले.

indian olympic association received a letter to help former cyclist
भारताचा आंतरराष्ट्रीय सायकलपटू ते अपार्टमेंटचा सुरक्षारक्षक!

नवी दिल्ली - भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष (आयओए) नरेंद्र बत्रा यांना माजी सायकलपटू स्वर्ण सिंग यांना मदत करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. 70 वर्षीय स्वर्ण सिंग यांनी 1970मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पण आता ते बिकट परिस्थितीत असून जमशेदपूरमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. स्वर्ण सिंग यांच्या दयनीय अवस्थेबद्दल कळताच एका अज्ञात व्यक्तीने बत्रा यांना पत्र लिहिले. स्वर्ण सिंग सध्या बारिडीह येथील एका अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत.

"टीबीची लागण झालेल्या आपल्या मुलीची काळजी घेण्यासही स्वर्ण सिंग सक्षम नाहीत. त्यांची पत्नी एकटीच आपल्या मुलीची काळजी घेत आहे. स्वर्ण सिंग भाड्याच्या घरात एकटेच राहत असून स्वत: साठी स्वयंपाक करतात. त्यांनी नाईट शिफ्टचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मी नवी दिल्लीतील क्रीडा मंत्रालयाशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वर्ण सिंग यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. स्वर्ण सिंग यांनी कोणतेही आंतरराष्ट्रीय पदक जिंकलेले नसल्यामुळे ते निवृत्तीवेतनास पात्र नाहीत", असे पत्रात म्हटले गेले आहे.

पत्रात पुढे असे लिहिले आहे, "स्वर्णसिंग यांनी 24 वर्षे टाटा स्टील क्रीडा विभागात काम केले आणि 1994 मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यांना मदत करण्यास टाटा स्टील जमशेदपूरच्या अधिकाऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे. त्यांच्या मुलाचे नाव रोजगार नोंदणीवर आहे. स्वर्ण सिंग यांच्या मुलाला रोजगार देण्यास सांगितले गेले आहे. सध्या तो दिल्लीत ड्रायव्हर म्हणून काम करत आहे."

"मी आयओए आणि इंडियन सायकलिंग फेडरेशनला स्वर्ण सिंग यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आवाहन करतो, जेणेकरून ते आपल्या कुटुंबासमवेत पुन्हा जगू शकतील. त्यामुळे ते टाट स्टील जमशेदपूरला स्वर्ण सिंग यांच्या मुलाला नोकरी देण्यास सांगतील आणि कंपनीचे क्वार्टरही राहण्यास देतील, जेणेकरून स्वर्ण सिंग आपल्या कुटुंबीयांसह शांततेत जगू शकतील", असेही या व्यक्तीने पत्रात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details