महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भालाफेकपटू नीरज चोप्राची सरावाला सुरुवात - neeraj chopra practice news

नीरजशिवाय अन्नू राणी, रोहित यादव आणि राजिंदर सिंग हेही या शिबिराचा भाग आहेत. त्यांच्यासमवेत उवे होन आणि डॉ क्लाउस हे प्रशिक्षक आहेत. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेदरम्यान चोप्रा आणि शिवपाल यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

Indian javelin thrower neeraj chopra starts practice
भालाफेकपटू नीरज चोप्राची सरावाला सुरुवात

By

Published : Dec 6, 2020, 1:09 PM IST

नवी दिल्ली -ऑलिम्पिक कोटा जिंकणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि शिवपाल यादव यांच्यासह इतर भालाफेकपटूंनी शुक्रवारी कलिंगा स्टेडियम येथे सरावाला सुरुवात केली.

हेही वाचा -न्यूझीलंडचा पहिल्या कसोटीत सहज विजय, केन विल्यम्सन सामनावीर

या पथकाने भुवनेश्वर येथील आपले शिबिर पटियाला येथील नॅशनल स्पोर्ट्स असोसिएशन (एनआयएस) येथे हलवले. हिवाळ्याच्या काळात पटियाला येथे थंडी असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. नीरजशिवाय अन्नू राणी, रोहित यादव आणि राजिंदर सिंग हेही या शिबिराचा भाग आहेत.

त्यांच्यासमवेत उवे होन आणि डॉ क्लाउस हे प्रशिक्षक आहेत. एशियन गेम्सचा सुवर्णपदक विजेता चोप्रा म्हणाला, ''आम्ही येथे ऑलिम्पिक २०२१स्पर्धेच्या सरावासाठी आलो आहोत. २०१७मध्ये मी येथे (आशियाई चॅम्पियनशिप) सुवर्णपदक जिंकले असून या शहराच्या आठवणी ज्वलंत आहेत.'' दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेदरम्यान चोप्रा आणि शिवपाल यापूर्वीच टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details