नवी दिल्ली - रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकून कोनेरू हम्पी भारतात परतली आहे. हम्पीने चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव करत विजेतेपदावर बाजी मारली होती.
हम्पी आज दुपारी विजयवाडा विमानतळावर पोहचली. तेव्हा चाहत्यांनी तिचे जंगी स्वागत केले. दरम्यान, हम्पीने मुलाला जन्म दिल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर पुनरागमन केले होते.
३२ वर्षीय कोनेरुचा पहिला फेरीमध्ये पराभव झाल्यानंतर, दुसऱ्या फेरीत मुसंडी मारत तिने पुनरागमन केले. त्यानंतर झालेल्या १२ व्या फेरीपर्यंत हम्पीने नऊ गुण मिळवत ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. हम्पी आणि टिंगजीचे गुण समान झाल्यामुळे विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीने करण्यात आला. अखेरच्या निर्णायक गेमसह हम्पीने विजेतेपद पटकावले.