महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

द्युती चंद पुन्हा चमकली, पटकावले सुवर्णपदक - द्युती चंद बातमी

भारताची स्टार धावपटू द्युती चंद हिने पाचवी इंडियन ग्रां प्री स्पर्धेत १०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. तिने शुक्रवारी झालेली १०० मीटरची शर्यत ११.४२ सेंकदामध्ये पूर्ण केली. तिच्या या यशाचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करुन तिचे अभिनंदन केले.

द्युती चंद पुन्हा चमकली, पटकावले सुवर्णपदक

By

Published : Aug 17, 2019, 7:49 AM IST

नवी दिल्ली - भारताची स्टार धावपटू द्युती चंद हिने पाचवी इंडियन ग्रां प्री स्पर्धेत १०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. तिने मिळवलेल्या या यशाचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करुन तिचे अभिनंदन केले.

द्युती हिने शुक्रवारी झालेली १०० मीटरची शर्यत ११.४२ सेंकदामध्ये पूर्ण केली. यापूर्वी द्युतीने वर्ल्ड यूनिवर्सिटी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ही स्पर्धा जिंकणारी द्युती भारताची पहिली महिला ठरली होती.

या स्पर्धेत तामिळनाडूच्या अर्चना सुरीनतरन हिने ११.५३ सेंकदा शर्यत पूर्ण करत रौप्य पदक जिंकले तर पंजाबची मानवीर कौर हिने १२.२८ सेकंदात कास्य पदकावर नाव कोरले.

दरम्यान, द्युती चंद कायम विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने आशियाई अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत दमदार कामगिरी करत वाहवा मिळवली. त्यानंतर तिने आपल्या समलिंगी नात्याबाबत कबूली दिली. त्यामुळे ती बऱ्याच काळ चर्चेत होती.

काही दिवसांपूर्वी तिला आगामी काळात होणाऱ्या युरोपियन स्पर्धांमध्ये भाग घ्यावयाचे होते. या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी द्युतीने व्हिसासाठी अर्ज केला आहे. पण काही कारणास्तव हे काम अद्याप पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे तिने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना वेळेत व्हिसा मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. यावर जयशंकर यांनी द्युतीला व्हिसा मिळवून दिला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details