टोकियो - भारताची युवा गोल्फर अदिती अशोक हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली. तिचे ऑलिम्पिक पदक एका स्ट्रोकमुळे हुकलं. पण तिच्या खेळाची देशभर चर्चा होत आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या आधी गोल्फ खेळाबद्दल अनेक लोकांना माहिती देखील नव्हती. पण अदितीमुळे त्यांना गोल्फची थोडीफार ओळख झाली. 23 वर्षीय अदिती भारतात गोल्फमध्ये पोस्टर गर्ल बनली आहे. पण अदितीच्या या यशात तिच्या आईचे महत्वपूर्ण योगदान आहे.
अदिती तिच्या आई सोबत टोकियो ऑलिम्पिकमध्ये पोहोचली होती. आई महेश्वरी अशोक ही अदितीची सावली म्हणून काम करत होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अदितीची कॅडी तिची आई होती.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आई बनली कॅडी -
अदितीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली आई महेश्वरीला कॅडी बनवलं आहे. जास्त करून खेळाडू अशा माणसाला कॅडी बनवतात जी, त्यांच्यावरिल दबाब कमी करेल.
काय असते कॅडीचे काम -
गोल्फपटूचा उत्साह कायम ठेवणं. त्याला खेळताना हवी असणारी सर्व मदत करणे हे कॅडीचे काम असते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अदितीची आईने ही जबाबदारी चोख पार पडाली.
अदिती गोल्फर होण्यामध्ये तिच्या आई वडिलांचा मोठा वाटा आहे. पाच वर्षांची असताना तिने गोल्फ शिकण्याचा हट्ट केला. तेव्हा आई वडिलांनी तिची इच्छा पूर्ण केली. आज त्यांचा हा निर्णय अदितीने सार्थ ठरवला.
दरम्यान, अदितीने 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये आपल्या वडिलांना कॅडी बनवलं होतं. ती त्यावेळी 18 वर्षांची होती. सर्वात कमी वयात ऑलिम्पिक खेळण्याचा विक्रम अदितीने केला. 2020 साली तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
हेही वाचा -Tokyo Olympics : गोल्फपटू अदिती अशोकचं पदक हुकलं; चौथ्या स्थानावर समाधान
हेही वाचा -Tokyo Olympics : भारत आणि पाकिस्तान सुवर्ण पदकासाठी आमने-सामने, आज होणार महामुकाबला