महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताच्या 'मलिक'चा नेपाळमध्ये डंका ! पटकावले सुवर्णपदक - Mr South Asia title

मलिकने 80 किलो वजनी गटातून ही कामगिरी करत सुवर्णपदक खिशात घातले.

भारताच्या 'मलिक'चा नेपाळमध्ये डंका!

By

Published : Jul 23, 2019, 4:03 PM IST

नवी दिल्ली -काठमांडू येथे पार पडलेल्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताच्या रवींद्र मलिक याने वैयक्तिक जेतेपदाचा मान पटकावला. मलिकने 80 किलो वजनी गटातून ही कामगिरी करत सुवर्णपदक खिशात घातले.

या स्पर्धेसाठी नेपाळला यजमानपदाचा मान मिळाला होता. भारताने या स्पर्धेमध्ये 4 सुवर्ण, 7 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकले आहे. महाराष्ट्राच्या दिनेश कांबळेला 65 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळाले. मलिकने नेपाळच्या मिलन सजापती आणि अफगाणिस्तानच्या मोहम्मद साखी यांना पिछाडत अव्वल कामगिरी केली.

सांघिक विजेतेपद अफगाणिस्तानला मिळाले असून त्यांच्या खात्यावर 535 गुम जमा झाले आहेत. 445 गुणांसह नेपाळने दुसरे तर, 380 गुणांसह भारताने तिसरे स्थान राखले.

ABOUT THE AUTHOR

...view details