बर्मिंगहॅम - कुस्तीपटू नवीन मलिकचे सुवर्ण, दीपक नेहरा आणि पूजा सिहाग यांच्या कांस्यपदकाने कुस्ती क्रीडा प्रकारात रविवारी भारतीयांची मान उंंचावली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक असे तिन्ही मिळून भारतीय चमुने आतापर्यंत 40 पदके आपल्या खात्यात जमा केली आहेत. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रविवारी भारतीय कुस्तीपटून नवीन, दीपक नेहरा, कुस्तीपटू पूजा सिहाग यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. तर भारतीय पुरुष हॉकीच्या संघाने ( Indian Hockey Team In Finals ) अंतिम फेरीत प्रवेश करीत पदक निश्चित केले आहे.
सुवर्णपदक जिंकल्याचा आनंद -मी देशासाठी सुवर्णपदक जिंकले याचा मला खूप आनंद आहे. मी चांगली तयारी केली आणि अंमलात आणली. मी कोणतेही दडपण न घेता खेळलो आणि पाकिस्तानी खेळाडूला हरवल्याचा आनंद वाटला. माझे पुढील लक्ष्य आशियाई खेळ आणि 2024 ऑलिम्पिक आहे, असे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ( Commonwealth Games ) मध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतीय कुस्तीपटू नवीनने म्हटले आहे.
प्रियांकाला रौप्य - कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( Commonwealth Games 2022 ) स्पर्धेत भारताला शनिवारी अजून एक पदक मिळाले आहे. प्रियांका गोस्वामीने महिलांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावले ( Priyanka Goswami won silver medal ) आहे. तिने 43.38 मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने 42.34 मिनिटात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. त्याचवेळी केनियाच्या एमिलीने 43.50.86 मिनिटांत शर्यत पूर्ण करून तिसरे स्थान पटकावले.
कुस्तीपटू पूजा सिहागने जिके कांस्यपदक -भारतीय क्रीडा प्राधिकरण आम्हाला खूप पाठिंबा देत आहे आणि त्यामुळेच भारत अनेक पदके जिंकत आहे. खेळादरम्यान बरेच भारतीय आम्हाला साथ देत होते की, हा खेळ भारतात घडत आहे असे वाटले, असे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये ( Commonwealth Games ) मध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर भारतीय कुस्तीपटू पूजा सिहागने म्हटले आहे.