महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक विजेत्या संजीवनी जाधवने नाशकात केले मतदान

संजीवनीने महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक मिळवले होते

संजीवनी जाधव

By

Published : Apr 29, 2019, 8:10 PM IST

नाशिक -आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीपध्ये भारतासाठी कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या संजीवनी जाधवने आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक येथिल चांदवड तालुक्यातील वडाळीभोई या गावात तिने मतदान केले.

संजीवनी केले मतदान


आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या संजीवनी जाधवने महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक मिळवले होते.


मतदान हा आपला हक्क असतो आणि तो हक्क प्रत्येकाने बजावायचा असतो. त्यामुळे युवा पिढीने मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहनही संजीवनी जाधवने यावेळी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details