नवी दिल्ली - भारताची स्टार महिला धावपटू हिमा दास हिने झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या स्पर्धेत आणखी एका सुवर्णपदाकावर बाजी मारली. मागील पंधरा दिवसांतील तिचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. टॅबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत 200 मीटरचे अंतर तिने 23.25 सेंकदामध्ये पार करत ही कामगिरी केली.
शेतकऱ्याच्या लेकीची भरारी...! हिमा दासने जिंकले पंधरा दिवसात 4 सुवर्णपदक - indian athlete hima das wins fourth gold medal In Tabor Athletics Meet
हिमा दासने झेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या टॅबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा धडाका लावला आहे. तिने 200 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकत, मागील पंधरा दिवसात सुवर्णपदाकाचा 'चौकार' मारला.
हिमा दास हिने झेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या टॅबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा धडाका लावला आहे. तिने 200 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकत, मागील पंधरा दिवसात सुवर्णपदाकाचा 'चौकार' मारला. हिमाने ही शर्यत 23.25 सेंकदात जिंकली. मात्र, तिची ही कामगिरी सर्वोत्तम (23.10 सेंकद) कामगिरीच्या जवळपासचीही नव्हती.
आसाम राज्यामधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमाने मागील वर्षी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत, जागतिक स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय धावपटू ठरली. त्यानंतर तिने पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत 200 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरले. नंतर तिने कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. आता झेक प्रजासत्ताक येथे सुरू असलेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकत भारताचा झेंडा अटकेपार नेला.