टोकियो - भारतीय अॅथलिट नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. नीरजने भालाफेक स्पर्धेमध्ये भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. पात्रता फेरीत नीरजची कामगिरी शानदार होती आणि त्याने अॅथलिटमध्ये 121 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. नीरजने अंतिम सामन्यात पहिला थ्रो 87.03 मीटर केला. तर दुसरा थ्रो त्याने 87.58 मीटर करत सुवर्ण पदक निश्चित केलं.
नीरजने पात्रता फेरीत आपल्या कामगिरीने खळबळ उडवून दिली होती. त्याने 86.65 मीटर थ्रो करत ग्रु ए मध्ये अव्वलस्थान पटकावले होते. नीरजने याआधी अशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल आणि आशियाई चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची नजर त्याच्या कामगिरी होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिल सुवर्ण पदक आहे. आता ऑलिम्पिकमधील पदकाची संख्या 7 इतकी झाली झाली आहे. यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कास्य पदक आहेत.
नीरज भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला. याआधी 2008 मध्ये अभिनव ब्रिंदा याने नेमबाजीत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. अॅथलेटिक्समध्ये भारताचे हे पहिलं सुवर्ण पदक आहे आणि यासह 23 वर्षीय नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. नीरजने पहिल्या दोन थ्रो मध्येच सुवर्ण पदक पक्के केलं. इतर अॅथलिट यांनी खूप प्रयत्न केलं. पण नीरजचा 87.58 मीटर थ्रो पार ते करु शकले नाहीत.