नवी दिल्ली -अव्वल भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतानू दास विवाहबंधनात अडकले आहेत. मंगळवारी रात्री रांचीच्या मोराबाडी येथे हा विवाहसोहळा पार पडला. या मंगल कार्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. या नवविवाहित जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही दाखल झाले.
बरेच दिवस एकमेंकाना डेट केल्यानंतर 2018 मध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. दीपिका आणि अतानू यांच्या लग्नपत्रिकेत कोरोना संबंधित सरकारी सूचनांचे अनुसरण करण्याची विनंती करण्यात आली होती. लग्नाच्या वेळी मास्क, सॅनिटायझर्स आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या.