नवी दिल्ली -भारताची अग्रणी महिला नेमबाज अपूर्वी चंदेलाला कोरोनाची लागण झाली आहे. अपूर्वीने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. ती ऑलिम्पिकच्या सरावासाठी पुढील तीन महिने क्रोएशिया येथे जाणार होती. पण त्याआधीच तिला कोरोनाची लागण झाली आहे.
अपूर्वीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारातून कोटा मिळवला आहे. ती या प्रकारात भारताचे नेतृत्व करणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय नेमबाजांचे ट्रेनिंग शिबीर क्रोएशियातील जगरेब येथे आयोजित करण्यात आले आहे. टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबीर ३ महिन्यापर्यंत चालणार आहे. यामुळे अनेक प्रशिक्षक आणि भारतीय नेमबाज या शिबीरात सहभागी होण्यास इच्छुक नाहीत.