ब्राझील -भारतीय नेमबाजपटूंनी ब्राझील येथे सुरू असलेल्या शुटिंग वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्णपदक तर, सौरभ चौधरीने कांस्यपदक पटकावून इतिहास रचला.
पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत अभिषेकने २४४.२ गुण कमावले. तर, सौरभला २२१.९ गुण मिळाले. अभिषेक आणि सौरभ यांनी पात्रता इवेंटमध्येच ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. या फेरीत सौरभ ५८४ गुणांसह चौथ्या तर, अभिषेक ५८२ गुणांसह पाचव्या स्थानावर राहिला होता.