हांगझोऊ- किशोरवयीन विश्वविजेत्या रुद्रांक्ष पाटीलच्या नेतृत्वाखालील भारतीय 10 मीटर एअर रायफल संघानं आज दमदार कामगिरी करत जागतिक विक्रम नोंदविला आहे.या रायफल संघानं पोडियममध्ये अव्वल स्थान मिळवून आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिले.
रुद्रांक्ष, ऑलिम्पियन दिव्यांश सिंग पनवार आणि ऐश्वरी प्रताप सिंग तोमर या त्रिकुटानं पात्रता फेरीत 1893.7 अशी गुण मिळवित चीन आणि दक्षिण कोरियाचं नेमबाजीतील वर्चस्व मोडून काढलयं. या संघानं सुवर्णपदकावर पटकावून भारताची मान जगभरात उचांवलीय.रुद्रांक्षने शानदार 632.5, तोमर 631.6 आणि पनवार 629.6 अशी एकूण जागतिक विक्रमी धावसंख्या नोंदवल्यानं दक्षिण कोरियाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलय. तर चीन हा तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. रुद्रांक्ष आणि ऐश्वरी यांनीही या स्पर्धेतील आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीनंतर ते अधिक प्रयत्न करणार आहेत. 10 मीटर एअर रायफल नेमबाजी सांघिक स्पर्धेत, पात्रता स्कोअरच्या एकूण गुणांवरून पदक विजेते ठरतात, तर प्राथमिक फेरीतील आठ अव्वल नेमबाज वैयक्तिक वैभवासाठी अंतिम फेरीत जातात.
पात्रता फेरीनंतर ऐश्वरी पाचव्या स्थानावर-तिन्ही भारतीय निशानेबाजांनी अप्रतिम धावसंख्या नोंदवली असताना, दिव्यांशला आशियाई खेळांच्या नियमामुळे अंतिम फेरीत प्रवेश न मिळाल्याने अत्यंत निराशा होणार आहे. रुद्रांक्षने तिसऱ्या स्थानावर अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पात्रता फेरीनंतर ऐश्वरी पाचव्या स्थानावर होती. दिव्यांश आठव्या स्थानावर होता. जर तो विश्वचषक किंवा विश्व चॅम्पियनशिप किंवा इतर कोणतीही महाद्वीपीय नेमबाजी स्पर्धा असेल तर तिन्ही भारतीय आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत पोहोचले असते.
प्रचंड कठोर प्रशिक्षण घेतले-रुद्रांक्षचे वडील बाळासाहेब पाटील हे पालघरचे पोलीस अधीक्षक आहेत. ते म्हणाले की, माझ्या मुलानं खेळात सर्वोत्तम कामगिरी करण्याची जिद्द ठेवली होती. त्याला स्वत:च्या क्षमतेवर प्रचंड विश्वास आहे. स्पर्धेसाठी हांगझोऊला रवाना होण्यापूर्वी देशासाठी पहिले सुवर्णपदक आणायचे आहे, असं त्यानं सांगितलं होतं. गेली दोन महिन्यांत त्यानं प्रचंड कठोर प्रशिक्षण घेतले आहेत. रुद्रांक्षचा भारताच्या राष्ट्रीय रायफल असोसिएशनने (NRAI) ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी बाकूला जाणाऱ्या संघात गेला नाही. रुद्रांक्षने गेल्या वर्षी कैरो येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून देशासाठी ऑलिम्पिक कोटामध्ये स्थान पटकावले होते.
हेही वाचा-
- Asian Games 2023: भारतीय महिला क्रिकेट संघाकडून श्रीलंकेचा 19 धावांनी पराभव, एशियन गेम्समध्ये जिंकले सुवर्ण