महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cairo Shooting World Cup : कैरो नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने जिंकले तिसरे सुवर्णपदक - भारताने जिंकले सुवर्ण पदक

राही सरनोबत, ईशा सिंग आणि रिदम संगवान या भारतीय त्रिकुटाने कैरो येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत, महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत ( Women 25m Pistol Team Competition ) सुवर्णपदक जिंकले.

Shooting
Shooting

By

Published : Mar 7, 2022, 1:55 PM IST

कैरो :आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत ( ISSF World Cup ) महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धा रविवारी पार पडली. या स्पर्धेत राही सरनोबत, ईशा सिंग आणि रिदम संगवान या भारतीय त्रिकुटाने सांघिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. भारतीय संघाने रोमहर्षक अंतिम सामन्यात सिंगापूरवर १७-१३ अशा फरकाने विजय मिळवत स्पर्धेतील तिसरे सुवर्ण जिंकले.

भारतीय त्रिकुटाने शनिवारी दुसऱ्या पात्रता टप्प्यात अव्वल स्थान मिळवून जेतेपद फेरीसाठी पात्र ठरले होते. हे ईशाचे दुसरे सुवर्ण आणि विश्वचषकातील तिसरे पदक होते. तिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले, तर महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले ( Won silver medal individual event ) होते.

दिवसात या अगोदर, भारतीय नेमबाज श्रीयांका सदंगी आणि अखिल शेरॉन यांनी 50 मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले ( Won bronze medal mixed team event ). भारतीय जोडी 34 संघांमध्ये पाचव्या स्थानावर होती. यानंतर तिने आठ जोड्यांमध्ये तिसरे स्थान पटकावले. तिने ऑस्ट्रियाच्या गेर्नॉट रम्पलर आणि रेबेका कोक यांचा पराभव केला. भारत पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर ( India second in the medal table ) आहे.

सौरभ चौधरी आणि महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल संघाने सुवर्णपदक पटकावले. तर ईशा सिंगने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये रौप्य पदक जिंकले. पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये भावेश शेखावत 12व्या आणि अनिश भानवाला 18व्या स्थानावर राहिले. गुरप्रीत सिंग 32 व्या स्थानावर राहिला.

ABOUT THE AUTHOR

...view details