काठमांडू -बॅडमिंटनपटूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताने १९ सुवर्णांसह ४१ पदके जिंकली आणि अव्वल स्थान मजबूत केले आहे. या स्पर्धेत भारताने एकूण १६५ पदके मिळवली असून त्यात ८१ सुवर्ण, ५९ रौप्य व २५ कांस्यपदकांचा समावेश आहे.
हेही वाचा -'या' विक्रमात हिटमॅनपेक्षा विराटच भारी...तुम्हीच पाहा काय सांगते आकडेवारी
शुक्रवारी भारतासाठी बॅडमिंटनपटूंनी चार सुवर्ण पदके जिंकली. अश्मिता चालिहा आणि सिरिल वर्मा यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीच्या बॅडमिंटन सामन्यात सुवर्णपदके जिंकली. यासह ध्रुव कपिलाने पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकून दुहेरी यश संपादन केले.