पुणे :महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे ( India Vs Sri Lanka T20 Match at MCA Stadium Gahunje ) येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट सामन्याचे गुरुवार, दि. ५ जानेवारी २०२३ रोजी ( T20 Series to be Held in Pune In New Year 2023 ) आयोजन करण्यात ( Match will be Held on January 5, 2023 ) आले आहेत. २२ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर २०२३ या नवीन वर्षात क्रिडा रसिकांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची मेजवानी मिळणार ( T20 Match Ticket Sale From 27 December ) आहे.
टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये आयोजित२०२३ या नवीन वर्षात भारतीय संघाच्या श्रीलंका संघाविरुद्धच्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यामध्ये आयोजित होणार आहे. याआधी पुण्यामध्ये मार्च २०२१ मध्ये भारतीय संघाचे इंग्लंड संघाविरुद्ध ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. नवीन वर्षात भारतीय क्रिकेट संघाचा घरचा आंतरराष्ट्रीय मौसम ३ जानेवारी २०२३ पासून सुरू होत असून, यामध्ये श्रीलंका संघाविरुद्ध टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांचे आयोजन केले गेले आहे. सध्या भारतीय संघ बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामने खेळत असून, २६ डिसेंबर २०२२ रोजी या दौऱ्याचा समारोप होणार आहे.
पुण्यात रंगणार भारत वि. श्रीलंका टी-20 सामना; तिकीट विक्रीस २७ डिसेंबरपासून सुरुवात एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवरील चौथा सामनाभारतीय संघ ३ जानेवारी २०२३ रोजी श्रीलंका संघाविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळणार असून, त्यानंतर ते पुण्यामध्ये दुसरा सामना खेळण्यास येणार आहेत. हा दिवस-रात्र सामना असणार आहे. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित होत असलेला हा चौथा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना ठरणार असून, तेरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरणार आहे. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत २ आंतरराष्ट्रीय कसोटी, ७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय टी-२० तसेच ५१ इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) सामन्यांचे आयोजन केले गेले आहे.
आतापर्यंत एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारताचा दोनदा विजयएमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे याआधी झालेल्या तीन आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाता दोनदा विजय मिळाले होते. २०१२ मध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. २०१६ मध्ये झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात श्रीलंका संघाने भारतीय संघाचा पाच गडी राखून पराभव केला होता. २०२० मध्ये झालेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाचा ७८ धावांनी पराभव केला होता.
भारतीय संघ टी-२० रेकॉर्डमध्ये सुधारणा करण्यात उत्सुकभारतीय संघ पुण्यामध्ये श्रीलंकेविरुद्धच्या १-१ (विजय-पराजय) या टी-२० रेकॉर्डमध्ये सुधारणा करण्यात उत्सुक असतील आणि या सामन्यात विजय मिळवल्यास मालिकेमध्येही आघाडी घेण्यास उत्सुक असतील, अशा विश्वास वाटतो. क्रिकेटप्रेमी आणि रसिकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका रोमांचकारी आणि उत्कंठावर्धक सामना अनुभवायला मिळेल, अशी आशा आहे.
टी-२० सामन्याची तिकीटविक्री २७ डिसेंबरपासूनभारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याच्या अधिकृत तिकीटविक्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आजपासून (मंगळवार, २७ डिसेंबर २०२२) १०.०० वाजता प्रारंभ करणार आहे. या टी-२० सामन्याची तिकीटे क्रिकेटप्रेमी दोन पद्धतीने मिळवू शकणार आहेत. 'बुक माय शो' या संकेतस्थळावर ही तिकीटे ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. तसेच, सामन्याची प्रत्यक्ष (बॉक्स ऑफिस) तिकीटविक्री पीवायसी हिंदू जिमखाना, भांडारकर रोड आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे होणार आहे. या दोन्ही ठिकाणांवरील बॉक्स ऑफिस सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत खुले असणार आहेत.
तिकीट विक्रीचे दर असेईस्ट स्टॅंड आणि बेस्ट स्टॅंड: रुपये ८००/- साऊथ अप्पर : रु. ११००; साऊय लोअर : रु. २०००/- साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टेड : रु. १७५०/- नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टैंड : रु. १७५०/- नॉर्थ स्टैंड : रु. २०००/- साकच पॅव्हेलियन ए आणि बी स्टेड : रु. ३५००/- कॉर्पोरेट बॉक्सचे ( १२ व्यक्तींची आसनक्षमता ) तिकीट रु. ६,००,०००/-