नवी दिल्ली:भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ( IND vs SA 1st T20 ) आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून इशान किशनने शानदार खेळी केली. त्याने 48 चेंडूत 76 धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार ऋषभ पंतने 29 धावांची तुफानी खेळी केली. हार्दिक पांड्या 31 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल आणि प्रिटोरियस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियासाठी इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सलामीला आले. यादरम्यान किशन 48 चेंडूत 76 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. तर ऋतुराज 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. या खेळीत त्याने 3 षटकार मारले. श्रेयस अय्यर 36 धावा करून बाद झाला. त्याने 27 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार ठोकला.