जकार्ता (इंडोनेशिया):आशिया चषक हॉकी ( Asia Cup Hockey ) स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड कायम ठेवली होती. बराच वेळ टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली होती. मात्र, शेवटच्या दोन मिनिटांच्या खेळात पाकिस्तानने गोल केला. त्यामुळे सामना 1-1 असा अनिर्णीत ( India vs Pakistan match draw ) सुटला.
सामन्याला 69 सेकंद बाकी होते आणि पाकिस्तानला कॉर्नर मिळाला. यावेळी मुशबहारने ड्रॅग फ्लिक खेळत प्रथम रशरने बॉल मारला आणि नंतर डिफेंडरने स्टिकने डिफेंडरला मारण्याचा प्रयत्न केला पण राणाने चेंडू ट्रॅप केला आणि चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. यासह दोन्ही संघांमधील सामना अनिर्णित राहिला. तर पूर्वार्धात गोलने आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. रिव्ह्यूनंतर भारताला पुन्हा कॉर्नर देण्यात आला. मात्र, संघाला गोल करता आला नाही. यानंतर टीम इंडियाला सातवा पेनल्टी कॉर्नरही मिळाला. मात्र पुन्हा एकदा ते अपयशी ठरले.