ढाका : मीरपूरच्या शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ( Test Being Played Between India and Bangladesh ) भारताने सुरुवातीच्या षटकांमध्येही ( India vs Bangladesh 2nd Test ) बांगलादेशला धक्का देत त्यांची सुरुवात बिघडवून ( India vs Bangladesh 2nd Test Match ) दिली. वृत्त लिहीपर्यंत बांगलादेशने दुसऱ्या डावात 2 गडी गमावून 26 धावा केल्या. आज सामन्याच्या दुसऱ्याच षटकात ( So Far Bangladesh have Lost 4 For 82 Runs ) अश्विनने नजमुल हुसेन शांतोला बाद करीत बांगलादेशला पहिला धक्का दिला. यानंतर सिराजने मोमीन-उल-हकला पंतच्या गोलंदाजीवर विकेटच्या मागे झेलबाद केले. दोन्ही खेळाडू केवळ 5-5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.
ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताच्या ३१४ धावापहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ३१४ धावा केल्या. अशा प्रकारे बांगलादेशविरुद्ध 87 धावांची आघाडी मिळवली. त्याचवेळी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने २० षटकांत एकही विकेट न गमावता ४० धावा केल्या होत्या. सलामीवीर झाकीर हसन (2) आणि नजमुल हुसेन शांतो (5) नाबाद माघारी परतले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान बांगलादेश संघ भारताच्या 80 धावांनी मागे होता.