महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

India vs Bangladesh 1st Test Match : बांगलादेश संघाच्या अडचणीत वाढ; दिवसअखेर 272 धावांवर 6 विकेट

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना ( India vs Bangladesh 1st Test Match ) चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. भारताने ( 1st Test Match 4th Day Live Updates ) बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य ( India Given Bangladesh to Target of 513 Runs to Win ) दिले. ( Bangladesh Scored 272 Runs on Loss of 6 Wickets ) आहे.

India vs Bangladesh 1st Test Match 4th Day Live Updates
बांगलादेश संघाच्या अडचणीत वाढ; दिवसअखेर 272 धावांवर 6 विकेट

By

Published : Dec 17, 2022, 5:28 PM IST

चटगाव : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी ( India vs Bangladesh 1st Test Match ) मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे खेळवला जात आहे. भारताने ( 1st Test Match 4th Day Live Updates ) बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य दिले ( India Given Bangladesh to Target of 513 Runs to Win ) आहे. याला प्रत्युत्तरात बांगलादेश संघाने सामन्याच्या चौथ्या दिवशी सहा विकेट गमावून २७२ धावा केल्या ( Bangladesh Scored 272 Runs on Loss of 6 Wickets ) आहेत. बांगलादेशला विजयासाठी 241 धावांची गरज आहे. सहा खेळाडू बाद झाल्याने बांगलादेश संघ अडचणीत आला आहे.

बांगलादेशच्या अशा प्रकारे पडल्या विकेट :पहिली विकेट नजुमल हसन शांतोची पडली. शांतोने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि एकूण 67 धावा केल्या. उमेश यादवने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यासिर अलीची दुसरी विकेट पडली. अक्षर पटेलने अलीला (5) बोल्ड केले. लिटन दासची (19) तिसरी विकेट पडली. दासने उमेशच्या हाती कुलदीप यादवकरवी झेलबाद केले. झाकीर हसनची चौथी विकेट पडली. हसनला आर अश्विनने कोहलीच्या हाती झेलबाद केले.

अक्षर पटेलने 88 व्या षटकाला घेतली मुशफिकर रहीमची विकेट :अक्षर पटेलने 88 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुशफिकर रहीम (23) ची पाचवी विकेट घेतली. पटेलने रहीमलाही बोल्ड केले. सहावी विकेट 88व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलने नुरुल हसनला (3) झेलबाद केले. झाकीर हसनने पदार्पणाच्याच सामन्यात शतक झळकावले. झाकीर हसनने कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. हसनने 224 चेंडूत 100 धावा केल्या.

भारताचा डाव :भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १४ डिसेंबरपासून सुरू झाला. भारताने पहिल्या डावात 404 तर दुसऱ्या डावात 258 धावा केल्या होत्या. बांगलादेशला विजयासाठी 513 धावांचे लक्ष्य दिले आहे.

बांगलादेश पहिला डाव :बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर बाद झाला. कुलदीप यादवने पाच, मोहम्मद सिराजने तीन, उमेश यादव आणि अक्षर पटेलने 1-1 बळी घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details