मेलबर्न : ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारतीय संघ कमकुवत दिसत असल्याने ऑस्ट्रेलिया आगामी चार सामन्यांची कसोटी मालिका जिंकू शकेल, असा विश्वास महान फलंदाज ग्रेग चॅपेल यांनी व्यक्त केला आहे. रस्ता अपघातात दुखापत झाल्यानंतर पंत जवळपास एक वर्ष खेळू शकणार नाही, तर बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर आहे.
कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो :चॅपलने 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'मध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलिया मालिका जिंकू शकतो. ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे भारतीय संघ कमकुवत दिसत आहे. विराट कोहलीवर खूप काही दडपण असणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने रणजी ट्रॉफीद्वारे पुनरागमन केले असून, गुरुवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तो संघात आहे. टर्निंग विकेट्सवर नॅथन लायनपेक्षा अॅश्टन आगरला प्राधान्य द्यायला हवे, असे चॅपल म्हणाले.