नागपूर :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदासोबतच कसोटी मालिकेतील वैयक्तिक कामगिरीवरही लोकांचे लक्ष असेल. यादरम्यान रोहित शर्मा टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन बनवण्याचा तसेच वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. रोहित हे करण्यात यशस्वी ठरल्यास टीम इंडिया तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 टीम बनणार आहे.
रोहित शर्माची कसोटी सामन्यांमधील कामगिरी टीम इंडियाने होम पिचवर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही :टीम इंडियाने गेल्या 11 वर्षांत घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळेच भारतीय संघावर दुसरी मालिका जिंकण्याचे दडपण आहे. जरी ऑस्ट्रेलियन संघ येथे मालिका जिंकण्यासाठी वेगळ्या पद्धतीने तयारी करीत असला, तरी भारताला ही मालिका जिंकणे महत्त्वाचे असणार आहे. फिरकी खेळपट्ट्यांवर सराव करण्यासोबतच ती 'अश्विन'सारख्या फिरकी गोलंदाजासोबत सराव करीत आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सिरीजमधील भारतीय संघाचा रेकाॅर्ड केवळ/फक्त 2012 मध्ये इंग्लडकडून भारताचा 2-1 ने झाला होता पराभव :इंग्लंडने शेवटच्या वेळी 2012 मध्ये भारताचा 2-1 ने पराभव करून कसोटी मालिका जिंकली होती. तेव्हापासून भारतात कसोटी सामना खेळण्यासाठी आलेल्या एकाही यजमान संघाला भारतीय संघाला हरवता आलेले नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघाबद्दल बोलायचे झाले, तर गेल्या 19 वर्षांपासून ऑस्ट्रेलियन संघ भारतीय भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. इतकेच नाही तर गेल्या तीन मालिकांमध्ये भारताने आपला दबदबा कायम ठेवला असून, सलग चौथी मालिका जिंकून ऑस्ट्रेलियाला त्याच पद्धतीने उत्तर द्यायचे आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या कसोटी सामन्यांचे आकडे रोहित शर्मावर दडपण असणार :रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर रोहित शर्माने आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये एकूण 8 शतके झळकावली आहेत. त्यापैकी 7 शतके केवळ घरच्या खेळपट्ट्यांवर झळकावली आहेत. गेल्या दीड वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर रोहित शर्माला गेल्या 16 महिन्यांत एकही कसोटी शतक झळकावता आलेले नाही. रोहित शर्माचे शेवटचे शतक सप्टेंबर 2021 मध्ये ओव्हलवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान झाले होते.
टी-20 सामन्यांचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे :इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याने हे शतक झळकावले. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर रोहितच्या जागी टी-20 सामन्यांचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आले आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा हा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा नियमित कर्णधार बनला आहे. पण, कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या वैयक्तिक कामगिरीत सुधारणा झाली नाही आणि 4 कसोटी मालिकेचा निकाल अपेक्षेप्रमाणे आला नाही, तर कसोटी सामन्यांमध्ये त्याचे कर्णधारपदाला धोका असू शकतो.
या कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माच असणार कर्णधार :या कसोटी सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणखी एक आकडा पूर्ण करू शकतो. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने 240 धावा केल्या तर मायदेशात कसोटी सामन्यांमध्ये 2000 धावा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू बनेल. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सात कसोटी सामन्यांमध्ये 31.38 च्या सरासरीने एकूण 460 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माची कसोटीतील कामगिरी :रोहित शर्माने कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून एकूण 2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने जिंकले आहेत. या दोन्ही सामन्यात रोहित शर्माला केवळ 90 धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्याकडूनही मोठ्या खेळीची गरज आहे. सध्या दोन्ही संघ सराव सत्रात चांगलाच घाम गाळत आहेत. नागपुरात दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी शुक्रवारी भरपूर घाम गाळला आणि वेगवान गोलंदाजीपेक्षा फिरकी गोलंदाजीचा सराव केला.