दोहा -विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या मिश्र रिले संघाने दमदार कामगिरी केली. ४X४०० मीटर रिले स्पर्धेत भारताच्या मोहम्मद अनास, वेलुवा कारथ विस्मया, जिसना मॅथ्यू आणि नोग निर्मल टॉम या चार खेळाडूंच्या संघाने अंतिम फेरीत धडक दिली आहे.
हेही वाचा -विजय हजारे ट्रॉफी : केएल राहुलच्या शतकामुळे कर्नाटकचा विजय
भारताने हीट -२ या स्पर्धेत ३ मिनिटे १६.१४ सेकदांची वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. आजपर्यंतची भारतीय खेळाडूंनी नोंदवलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा प्रवेश निश्चित झाला आहे. भारताच्या मोहम्मद अनासने संथ सुरुवात केली होती. त्यानंतर विस्मयाने ही पिछाडी भरून काढली.
विस्मयानंतर मॅथ्यूही मागे पडली होती. मात्र, निर्मलने ही कसर भरून काढत भारताला अंतिम फेरीत पोहोचवले. या रेसमध्ये पोलंडचा संघ ३ मिनिटे १५.४७ सेकंदासह पहिल्या स्थानावर राहिला. तर दुसरे स्थान ब्राझीलच्या संघाने पटकावले.