जकार्ता:भारतीय हॉकी संघ आणि दक्षिण कोरिया संघ ( India vs South Korea ) यांच्यात मंगळवारी जीबीके स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉकी स्टेडियमवर सामना पार पडला. हा सामना दोन्ही संघात 4-4 असा बरोबरीत राहिला. रोमांचक सामना बरोबरीत राहिल्याने भारताच्या हिरो आशिया कप 2022 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी ( India out of asia cup title ) हुकली. सुपर-4 पूल टेबलमध्ये कोरिया आणि मलेशिया गोल फरकाने आघाडीवर असल्याने भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. भारताने शेवटच्या क्षणापर्यंत कोरियाशी झुंज दिली, पण सामना जिंकता आला नाही.
भारताकडून नीलम संजीव जेस (9' मि.), मनिंदर सिंग (21' मि.), शेषे गौडा बीएम (37' मि.) आणि मारिसवरन शक्तिवेल (37' मि.) यांनी गोल केले. कोरियासाठी जँग जोंगह्युन (13'मि.), जी वू चिऑन (18'मि.), किम जंग हू (28' मि.) आणि जँग मांजे (44') यांनी खडतर लढतीत गोल केले. आता बुधवारी ब्राँझपदकाच्या लढतीत भारताचा सामना जपानशी होणार ( India face Japan bronze medal match ) आहे. आजच्या सामन्यात भारताने आक्रमक सुरुवात केली. दीपसन तिर्की डावीकडून आत येतो तो चेंडू वर्तुळाच्या आत पवन राजभरकडे देण्यास गेला, पण कोरियाच्या बचावाने तो नाकाम केला.
पेनल्टी कॉर्नरच्या संधीनंतर काही मिनिटांत कोरियाने नीलम संजीव जेसने पुन्हा बचाव केला. पण भारताने आक्रमणच सुरूच ठेवले. नीलम संजीव जेसला काही मिनिटांनंतर पीसीद्वारे आणखी एक संधी मिळाली आणि यावेळी त्याने गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण कोरियाने पहिल्या क्वार्टरअखेर जँग जोंगहुनने केलेल्या पीसीने बरोबरी साधली.