चेन्नई -भारतीय बुद्धिबळ संघाने आपली प्रभावी कामगिरी सुरू ठेवत फिडे ऑनलाइन ऑलिम्पियाडच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताने पोलंडचा पराभव केला. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक फेरी जिंकल्यानंतर टायब्रेकमध्ये जलद प्रकारातील खेळाडू कोनेरू हम्पीने मोनिका सोकोचा पराभव केला. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना हम्पीने भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले.
उपांत्य फेरीच्या सामन्याची सुरुवात भारतासाठी चांगली झाली नाही. पहिल्या फेरीत २-४ असा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. पण भारताने दुसऱ्या फेरीत ४.५-१.५ असा शानदार विजय मिळवत पुनरागमन केले.